🙏🏻 ग्रामपंचायत खसाळा आपले सहर्ष स्वागत करीत आहे ! 🙏🏻 ग्रामपंचायत खसाळा कडून जाहीर नोटीस / दुकान गाळे किराया !
Recent Events
Event
जागतिक योग दिन

आज दिनांक २१ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत खसाळा येथे जागतिक योग दिनानिमित्त पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली.
*मन ठेवायचे असेल शांत, तर योगा नियमित करणे आहे अनिवार्य, योग दिनाच्या शुभेच्छा!
*जगाला आनंदी आणि सुदृढ करूया, चला सर्व योगाकडे वळूया, जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा!
*शरीर निरोगी असेल, तर मनही निरोगी राहते, सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा! ​
@आपली खसाळा ग्रामपंचायत.
अधिक माहिती »

Event
Event
जागतिक पर्यावरण दिन

माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आज दिनांक ०५ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत खसाळा येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली.स्वच्छ आणि निरोगी जगासाठी योगदान देण्यासाठी आपण सर्वजण आपला विनम्र भाग करू या. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जर तुम्ही पाण्यात विष टाकले तर तुम्ही शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याची अपेक्षा करू शकत नाही. पर्यावरण वाचवा, पृथ्वी वाचवा.
@आपली खसाळा ग्रामपंचायत.
अधिक माहिती »

Event
Event
जागतिक सायकल दिन

माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आज दिनांक ०३ जून २०२५ रोजी ग्रामपंचायत खसाळा येथे जागतिक सायकल दिनानिमित्त पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी लहान मुलांसोबत सायकल रॅली  काढण्यात आली.
@आपली खसाळा ग्रामपंचायत.
अधिक माहिती »

Event
Event
ग्रामसभा मे २०२५

ग्रामगुज!!..ग्रामपंचायत खसाळा येथे २८ मे २०२५!!. रोजी गावात गत पंचवीस वर्षात गावकरी प्रथमच अशी ग्रामसभा अनुभवीत होते. ना वाद, ना कुणाचे उणेदुणे काढणे..चर्चा फक्त विकास कामाची.नव्या दमाच्या सरपंच मॅडमने नव्याने गावघडन करण्याचा जणू विडा उचलला.. त्यांच्या प्रयत्नांना गावकरी देखील कृतिपूर्ण साथ देत आहेत. उद्देश चांगला असला की लोक जुळतात.गावभान जागृत करणे तेवढे महत्वाचे असते. घरोघरी जाऊन त्यांनी ग्रामसभेचे महत्व पटवून देत आमंत्रणाची अक्षदा दिली. हल्ली ग्रामसभे विषयी निष्क्रियता बाळगणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक करीत उपस्थिती दर्शवली..
@आपली खसाळा ग्रामपंचायत.
अधिक माहिती »

Event
Event
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस

ग्रामपंचायत खसाळा येथे २२ मे २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त, आपण जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत वस्तूंचा वापर करण्यासाठी सुरवात करूया. अन्नाची नासाडी कमी करूया आणि बाहेरील पदार्थ वाहून नेण्यासाठी पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या वापरूया असे सर्वांना सांगण्यात आले. त्यामध्ये सहभागी ग्रामपंचायत सदस्य गण, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट महिला व गावकरी युवा वर्ग उपस्थित होते.
@आपली खसाळा ग्रामपंचायत.
अधिक माहिती »

Event