🙏🏻सर्व खसाळा ग्रामवाशियांना गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा  🙏🏻 ग्रामपंचायत खसाळा कडून जाहीर नोटीस / दुकान गाळे किराया !

जाहीर नोटीस

🙏🏻सर्व खसाळा ग्रामवाशियांना गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा🙏🏻


ग्रामपंचायत खसाळा कडून जाहीर नोटीस / दुकान गाळे किराया

वाचा : ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक १२/०३/२०२५ ठराव क्र. ९

ग्रामपंचायत खसाळा कडून सर्व गावातील नागरिकांना कळविण्यात येते कि, ग्रामपंचायत खसाळा येथील दुकान गाळे एकूण ४ असून या दुकान गाळे प्रती महिना दराने किरायाने देणे आहे करिता इस्छुक दुकान धारकांनी दिनांक २६/०३/२०२५ ते०१/०४/२०२५पर्यंत आपले अर्ज ग्रामपंचायत कार्यालय येथे सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत सादर करावे. व दिनांक ०२/०४/२०२५ ला सकाळी ११.०० वाजता दुकान गाळे लिलावास सुरुवात करण्यात येईल तरी इच्छुक बोली धारकांनी याची नोंद घ्यावी.

अटी व शटी

१. दुकान गाळे किराया पूर्वी अर्जा सोबत रुपये १०,०००/- चा डी. डी. बनवून या रोख रक्कम ग्रामपंचायत खसाळा या नावाने अर्जा सोबत दिनांक ०१/०४/२०२५ ला ५.०० वाजे पर्यंत सादर करावे. व लिलावाची सरकारी बोली ५०,०००/- रुपये पासून सुरुवात होईल.

२. दुकान गाळेची अनामत रक्कम ठेवीची सरकारी बोली पन्नास हजार रुपये पासून राहील.

३. दुकान गाळे किराया प्रती महिना ५०००/- रुपये राहील

४. सरकारी बोलीचा दरापेक्षा ज्यांचे दर जास्त राहील त्यांना दुकान गाळे ११ महिन्या करिता किरायाने देण्यात येईल त्यानंतर प्रती महिना १०% दराने दरवर्षी ग्रामपंचायत मार्फत वाढ करण्यात येईल.

५. दुकान गाळेच्या किराया तथा किरायाधारकाला मंजूर झाला त्यांनी प्रती महिन्याला दिनांक १ ते १० पर्यंत किराया ग्रामपंचायतला जमा करणे बंधनकारक राहील उशीर झाल्यास ५% विलभशुल्क आकारण्यात येईल.

६. दुकान गाळे किरायाने देण्याच किंवा मंजूर ना मंजूर करायचा अधिकार ग्रामपंचायतने राखून ठेवलेला आहे.

७. प्रती एका व्यक्तीस एकच दुकान गाळे देण्यात येईल.

८. अर्ज भरते वेळीस आधार कार्डची झेरॉक्स सोबत जोडण्यात यावी.

९. अनामत लिलावाची रक्कम उच्च बोली बोलणाऱ्या इसमास दुकान गाळे किरायाने देण्याचे ठरविण्यात येईल.

प्रातीलीपी

१. गावातील मुख्य चौकात तसेच ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावर प्रती सादर.

२. गावात जाहीर दवंडी द्वारे प्रसिद्धी सादर.

********

ग्रामपंचायत खसाळा