पर्यावरणपूरक होळी २०२५ :-
🙏🏻सर्व खसाळा ग्रामवाशियांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा 🙏🏻
ग्रामपंचायत खसाळा कडून जाहीर आवाहन !
संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा होणारा होलिकात्सव पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचविता साजरा करण्यासाठी नागरिकांनी...
• होलिका दहनाकरिता वृक्षतोड न करता लाकडी कचरा, टाकाऊ वस्तू इ. वस्तूंचा वापर करावा. • होळी खेळताना पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काटेकोर काळजी घ्यावी. • नैसर्गिक पर्यावरणपूरक रंगांचाच वापर करावा (उदा. गुलाल, हळद इ.). • केमिकल अथवा मेटॅलिक रंग हे डोळे, त्वचा यासाठी तसेच पर्यावरणासाठी हानिकारक असून यांचा वापर पूर्णतः टाळावा. • पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा वापर टाळावा किंवा कमीत कमी वापर करावा. • फुगे अथवा प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये त्या पासून पर्यावरणाला व मानवी अवयवांना धोका संभवतो. • वायुप्रदूषण तसेच ध्वनीप्रदूषण टाळावे. • रंग खेळताना पाळीव प्राण्यांचीही काळजी घ्यावी. • होळी सणानंतर झालेल्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. सण, उत्सव आनंदाने साजरे करताना पर्यावरणाची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. म्हणूनच पर्यावरणपूरक होळी उत्सव, धूलिवंदन साजरे करूया निसर्गाचे रक्षण करूया ******** ग्रामपंचायत खसाळा |